थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळे वेगवेगळे देखावे सादर करुन भाविकांना बाप्पाचे मोहक रुप दाखवताना दिसतात.महाराष्ट्रात गणेशाची आठ ठिकाणे अष्टविनायक म्हणून परिचित आहेत.या गणेशोत्सवा दरम्यान अनेक भाविक या ठिकाणांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतात.थेऊर येथील श्री चिंतामणीसाठी देखील उत्सवात वेगवेगळ्या आरास करण्याची संकल्पना देवस्थानचे पुजारी आगलावे बंधू यांनी साकारली आहे.
आज चिंतामणीसाठी तळ्याची आरास साकारली आहे.तळ्यात कमळ उमललेली आहेत हा देखावा अनेक भाविकांना आकर्षित करताना दिसत आहे. मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे आणि रात्रीचे नयनरम्य वातावरण मनाला आल्हाददायक वाटत.
