थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात गणेशोत्सव काळात दररोज एक नविन आरास केली जात आहे.त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना नविन रुपात बाप्पाचे दर्शन मिळत आहे.
गणपती बाप्पाचे आपल्या राज्यात विशेष आकर्षण असते याची उत्सुकता वर्षभर लागून असते घराघरात बाप्पांचे आगमण होते प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार आरास करतात.अलिकडे पर्यावरण जणजागृती अधिक झालेली दिसते अनेक ठिकाणी असे देखावे पहावयास मिळत आहे.
श्रावण महिन्यात थेऊर येथील चिंतामणी मंदिरात वेगवेगळ्या सणांचे औचित्य साधून बाप्पाची आरास करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून या गणपती उत्सवात देखील देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले यातून आज अवकाशातील ढगांमध्ये मार्गक्रमण करणाऱ्या बाप्पाचे रुप अवतण्यात आले आले.
