पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुरमध्ये लव्ह जिहादच्या पाच घटना घडल्याचे उघड झाले असून हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आज श्रीरामपुर शहरात मोर्चा काढून यातील अरोपीवर अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

राज्यात अलिकडे लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असल्याचा सणसणाटी अरोप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता.तर याचाच प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील पाच तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात पकडून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आल्याचे समोर आले आहे यावर पोलिसांकडून सुरुवातीला याकडे इतके गांभीर्यपूर्वक पाहिले जात नव्हते परंतु आज शहरात विविध हिंदू धर्म संघटनांनी रस्त्यावर उतरून यातील अरोपीं विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती.जर हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने सर्व शहरातील व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून बंद पुकारु असे जाहीर करण्यात आले.

हिंदू धर्मातील तरुण मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना वाम मार्गाला लावण्याचे षडयंत्र चालू असल्याचे यावेळी या संघटनांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *