थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने येथील प्राचिन शिवालय मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली यात गावातील मुख्य चौकातील पंचलिंग मंदिर,पूर्वेस असलेल्या सिध्देश्वर मंदिर तसेच उत्तरेस असलेल्या खडकेश्वर मंदिरात महापुजा करण्यात आली.हिंदू संस्कृतीत या महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर अनेक सण वृतवैकल्य याच महिन्यात पार पाडले जातात.
या महिन्यातील विशेष देवता देवाधीदेव महादेव असल्याने सोमवारचे महत्त्व अधिक आहे आज या महिन्यातील शेवटचा सोमवार त्यामुळे शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.येथील चिंतामणी सेवा मित्र मंडळाच्या वतीने खडकेश्वर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.
