पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण कवी कवयित्रींना विचारपीठ उपलब्ध करून दिले.यासाठीच त्यांनी स्व.राजकुमार काळभोर यांनी आपल्या वयाची तीस वर्षे मराठी साहित्यासाठी अविरत धडपड चालू होती त्यांनी साहित्यिकांना पुरस्कार दिले. तसेच अनेकांना साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान केले, असे मत जेष्ठ विचारवंत शरद गोरे यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचा कार्यक्रम स्व.राजकुमार काळभोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी हडपसर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुणेजिल्हा आणि साहित्य सम्राटचे १५२ वे कविसंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोषात पार पडला.
यावेळी विचारपीठावरील अ.भा.म.सा.परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ, कविसंलनाचे अध्यक्ष सीताराम नरके,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, उद्घाटक संगीता जामगे, प्रमुख पाहुणे बाळासाहेब गिरी, विशेष अतिथी जेष्ठ गझलकार म.भा.चव्हाण आणि संयोजक सूर्यकांत नामुगडे, नानाभाऊ माळी, अमोल कुंभार, मिलिंद कुंजीर ,रोहिणी जाधव यांनी काळभोर यांना शब्दांजली वाहिली.
यावेळी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण राज्यातुन एकूण पंचाहत्तर कवी कावयित्रींनी आपल्या बहारदार काव्यरचनांनी आणि गझलांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत नामुगडे यांनी तर कविसंलनाचे सूत्रसंचालन आणि आभार विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केले.
