पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  सोलापूर – महामार्गावर जाहिरात फलकांचा बाजार भरला असून यावर प्रशासनाचे इतके दुर्लक्ष कसे हा प्रश्न पडला आहे.कवडीपाट टोलनाका पासून कासुर्डीफाट्यापर्यंतचा रस्ता दुभाजकाच्या मध्ये स्थानिक ग्रामपंचायतने प्रवाशांच्या सोयीसाठी लाईटचे खांब उभे करुन प्रकाशाची सोय केली आहे परंतु या खांबावर सध्या आपल्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे यात प्लाटिंग,हाॕटेल,अमृततुल्य,कोचिंग क्लासेस ,फायनान्स लाॕनच्या जाहितीचे फ्लेक्स लावून महामार्गाचे अक्षरशः विद्रूपिकरण केले असून यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे थेऊरफाटा ते लोणीकंद या राज्यमहामार्ग क्रं५८वर चौकातून थेऊरकडे वळण घेणाऱ्या दुभाजकाच्यामध्ये लावलेल्या अष्टविनायक गणपती मंदीराकडे या सूचना फलकावर वेगवेगळ्या जाहिराती लावल्यामुळे थेऊरकडून पुण्याकडे जाताना महामार्ग ओलांडताना या  जाहिरीतीमुळे मोठा अडसर होत होतो, अंदाज चुकुन अपघात होते. त्यामुळे अशा अपघातास निमंत्रण देणाऱ्या जाहिरातबाजांवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे या चौकात अनेक अपघात घडले त्यात अनेक जणांचे प्राण गेले
        तर दुभाजकावरील पोलवर जाहिरातीचे फ्लेक्स गाडीचा धक्का लागून तसेच तुटलेल्या अवस्थेत लोंबकळत आहे प्रवास करताना अनेक वेळा या जाहिरातीवर वाहन चालकाचे लक्ष जाऊन रस्त्यावर दुर्घटना घडण्याचा  मानव निर्मित धोका निर्माण झाला आहे पुणे सोलापूर महामार्गावर सध्या अडगळीत पडला की काय अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे प्रत्येक चौकात असलेले हायमाक्सच्या मोठ्या खांबावर दोन्ही बाजूनी जाहिराती लावल्यामुळे अनेकदा राञीच्या वेळी रस्त्यावरून वाहन चालवताना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याना यांचा ञास होतो जाहिरात फलक खांबावर लावल्यामुळे तो दोन्ही बाजूनी रस्त्यावर आल्यामुळे गाडीला घासून तुटून मागच्या गाडीवर पडून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे महामार्गावर अनेक समस्या निर्माण झाल्या असून रस्त्यावर रेतीचे थरच्या थर साचले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेल्या पुलावर बाभळी, गवत वाढले आहे रस्ता दुभाजकावर असलेले प्रकाश रोधक फायबरची(लाईट बेरियर) दूरवास्था झाली आहे तर काहीवर जाहिराती लावून विद्रुपीकरण केले आहे त्यामुळे या महामार्ग अनेक संकटांचा सामना करत आहे या महामार्गावर प्रवास करताना होणार ञास थांबणार तरी कधी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
“जाहिरात फलकामुळे अनेक अपघात होत आहेत यावर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलून कडक कारवाई करावीमहामार्ग स्वच्छ करावा”
                       मारुती कांबळे,
   (हवेली तालुकाध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *