थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या तरीने सहभाग घेत आहे गाव पातळीवरील शालेय विद्यार्थ्यांकडून यासाठी जय्यत तयारी चालू आहे यात प्रभातफेरी,सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येत आहे.यात अगदी अंगणवाडीत शिक्षण घेत असलेले बालचमू देखील मागे नाहीत.आज सोमवारी थेऊर येथील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या छोट्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशात गावात प्रभातफेरी काढली होती यात पालकांचाही सहभाग उल्लेखनीय होता.

थेऊर गावठाणातील अंगणवाड्या तसेच अन्य वस्त्यावरील वेशभूषेतील विद्यार्थी,एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका अस्मिता सस्ते अंगणवाडी सेविकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह मुख्य रस्त्यावरून ही फेरी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत आणली तेंव्हा सरपंच शितल काकडे उपसरपंच आण्णासाहेब काळे,ग्रामविकास अधिकारी भापकर,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,युवराज काकडे,राहुल कांबळे, शशिकला कुंजीर,रुपाली रसाळ, मंगल धारवाड,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे,पोलिस हवालदार नरेंद्र सोनवणे तसेच माजी उपसरपंच शहाजी जाधव,सुरेश चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,ग्रामपंचायत कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रकाश आळंदे आदींनी या फेरीचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *