थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गेली दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही परंतु यावर्षी हा आनंद सोहळा अनुभवन्याची संधी मिळणार आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज देहू नगरीतून प्रस्थान होणार आहे यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत अशीच श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी प्रासादिक दिंडीचे थेऊर येथून प्रस्थान झाले यावेळी गावातील अनेक भाविकभक्त यात सहभागी झाले होते.

सकाळी साडे सात वाजता चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ श्री चिंतामणी मंदिरात जमा झाले त्यानंतर सालाबादाप्रमाणे तेथे पंचपदी घेण्यात आली.त्यानंतर हा वैष्णवाचा मेळा विठ्ठल रुख्मिनी मंदिरात आला तेथे संतानी रचलेले अभंग गायिली.तर काहींनी फुगड्या घातल्या व उत्साहात देहूकडे मार्गस्थ झाला.यावेळी हभप रुख्मिनी तारु महाराज, ज्ञानोबा कुंजीर, विठ्ठल कुंजीर, एकनाथ महाराज तारु,चिंतामणी तारु,बाळासाहेब गिरमकर, रंजना सोनवणे,माजी सरपंच छाया काकडे,आनंद काकडे,योगेश काकडे,अविनाश सोनवणे,ग्रामपंचायत सदस्या शशिकला कुंजीर,भरत कुंजीर,संपत बिनावत,आण्णा बोडके आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *