थेऊर (हवेलीनामाऑनलाईन) उष्णतेची तिवृता दिवसेंदिवस वाढत गेली याचा परिणाम सर्वसामान्य जीवनावर जाणवत असून अर्थिक व्यवहार अडचणीत येत आहेत महागाईने कळस गाठला असल्याने अपसुकच प्रत्येक जण आगाऊ खर्चाला फाटा देत आहे. थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र येथे श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते सध्या उन्हाळा सुट्टीचा हंगाम असूनही संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची संख्या रोडावलेली होती.
पहाटे पाच वाजता विद्याधर आगलावे यांनी विधीवत महापुजा करुन देवालय दर्शनासाठी खुले केले सकाळी थोड्याफार प्रमाणात भाविक रांगेत होते परंतु नेहमीप्रमाणे दर्शनबारी मंदिराबाहेर आली नाही.दिवसभर ढगाळ वातावरण असूनही भाविकांची संख्या मर्यादित असल्याचे दिसून आले.सायंकाळी थोडी संख्या वाढली चंद्रोदयानंतर छबिना काढण्यात आला व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
