लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) समाज कार्य करताना स्वतःला त्यात झोकून देऊन काम करणे काही व्यक्तींच्या अंगवळणी पडलेल असत आणि त्यामुळेच मग तो दिवस असो की रात्र याचही भान राहत नाही असाच एक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुक्याचा सदस्य राम भंडारी लोणी-काळभोर परिसरात प्रत्येक कार्यात सर्वात अगोदर पोहोचतो व सेवा देतो.आपल्या प्रपंचातील कामांनाही प्रसंगी बाजुला ठेवुन केवळ सेवा भाव जपणे आपले परम कर्तव्य समजणारा सच्चा हरहुन्नर म्हणून ओळखला जाणारा राम भंडारी

असाच एक प्रसंग नुकताच घडला एक लहान मुलगी रस्ता चुकली व आपल्या आई वडिलांपासून भरकटली ते भेदरलेल बाळ लोणी स्टेशन परिसरात सापडल म्हणून राम त्याला घेऊन लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.आपल्या संपर्कातील मित्र परिवार यांना याची कल्पना दिली दरम्यान त्या बाळाचे पालक पोलीस स्टेशनला पोहोचले.बाळ आपल्या आई वडीलांच्या ताब्यात दिले.

तेवढ्यात लोणी काळभोर येथील इनामदारवस्ती जवळ एका विहिरीत एक व्यक्ती पाण्यावर तरंगत असल्याची माहिती लोणी काळभोर शहर पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ त्याव्यक्तीच्या नातलगांचा शोध घेतला, याचवेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य राम भंडारी यांना याविषयीची माहिती मिळाली त्यांनी त्यांचा सहकारी अमोल खोले यांनी अग्निशमन पथकास संपर्क याची माहिती दिली, त्याच बरोबर महावितरण चे तंत्रज्ञ अमोल शेलार, योगेश गिरी यांना ही तात्काळ विहिरीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले, कारण त्या ठिकाणी काम करीत असताना कोणाशी कुठलाही धोका निर्माण होऊ नये, (PMRDA) च्या अग्निशमन पथकाचे वाहन चालक संदीप शेळके, फायरमन संदीप तांबे, मुस्ताक तडवी, उमेश फाळके, तेजस डांगरे हे अधिकारी-कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आपल्या कार्यास सुरुवात केली.यावेळी राम भंडारी व अमोल खोले यांनी मोलाची मदत केली.

या घटनेत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती विलास अंबरनाथ चव्हाण असल्याचे समजले वैद्यकीय परिक्षणासाठी त्यास ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

लोणी काळभोर शहर पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे, पोलीस हवालदार भोसले यांनी घटनास्थळी नातलगांना बोलवून घेऊन पंचनामा केला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *