पुणे ( हवेलीनामा ऑनलाईन ) भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा प्रमुख. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोर ओबीसी आरक्षणावरुन जोरदार आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.

मध्यप्रदेशने मिळविले आणि महाराष्ट्राने गमविले,स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेले आहे. सदर ठिकाणी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर गेलेले राजकीय आरक्षण एका महिन्याच्या आत एम्पिरिकल डाटा मिळू शकते असा दावा प्रमुख मान्यवरांनी केला.

विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यांमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल डाटा मिळवण्यासाठी ट्रिपल टेस्ट सांगितली होती, त्यातली पहिली स्टेट म्हणजे, स्वतंत्र तज्ञांचा आयोग नेमावा अशी होती. परंतु राज्य सरकारने स्वतंत्र बांठिया आयोग मिळण्यासाठी १३ महिने लागले, मध्य प्रदेश सरकारने विकास गवळी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणाची माहिती मिळताच ६ महिने पूर्वीच स्वतंत्र आयोग नेमून, एम्पिरिकल डाटा मिळविला, हाच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधला फरक आहे.

राज्यानी चुकावर चुका केल्या, सुरुवातीला निरगुडकर यांचा जो कायम आयोग आहे त्यांना ही जबाबदारी दिली,निरगुडकरांनी मागितलेला फंड ६ महिने दिला नाही, दरम्यान गरज नसताना ऑर्डिनन्स काढले ते ऑर्डिनन्स सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये परत एक कायदा बनवला,वार्ड रचना काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले,तोही कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही.प्रत्येक वेळेला राज्य सरकारला चपराकच मिळाली,परंतु राज्य सरकारमध्ये सुधारणा झाली नाही.ओबीसीचे नेते म्हणवणाऱ्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केला नाही, राज्याच्या विधी विभाग,ग्रामीण विकास विभाग,यांचे सचिव यांनी वेळोवेळी सरकारला चुकीची माहिती दिली.प्रत्येक वेळेस सरकारला अडचणीत आणण्याचे काम उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केले,ओबीसींना आरक्षण मिळू नये अशी व्युवरचना आखण्यात आली.आणि त्यामध्ये झारीतील शुक्राचार्य यशस्वी होत गेले.

ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ऊदया शुक्रवारी पुणे येथे 21 मे 2022 रोजी बांठिया आयोगासमोर याबाबतीत डेमो सादर करून,ओबीसी आणि भटके विमुक्तांचे आरक्षण कसे मिळविता येईल याचे सादरीकरण करणार असल्याचे प्रमुख नेत्यांनी सांगितले.

या प्रसंगी ओबीसी मोर्चा पुणे शहर च्या वतीने दिपक माने, दिनेश नायकु,संतोष शिंदे, नंदकुमार गोसावी,शंतनु नारके,बापु नाईक,यशोधन आखाडे,राजेंद्र पाषाणकर, स्मिता गायकवाड, विकी ढोले, दिनेश रासकर,तुषार रायकर,रमेश चव्हाण,विक्रम फुंदे,संदिप कर्डेकर, सागर धोञे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *