पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे येथे बाबुराव सनस मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या 10 व्या मुलां व मुलींच्या सब ज्युनिअर अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पुणे शहर मुलींचा बॉक्सिंग संघ विजयी ठरला असून आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे क्लबच्या कु.सृष्टी विजय जाधव हिने सुवर्णपदक मिळवत कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.तर सोनिया अभिमन्यू सूर्यवंशी हिने 32 ते 34 किलो वजन गटात रौप्यपदक मिळवले व अथर्व राहुल कांबळे याने 34 ते 37 किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले.
या स्पर्धकांना बॉक्सिंग असोसिएशनचे सेक्रेटरी मदन वाणी ,आंतरराष्ट्रीय बाबा कोच विजय गुजर , अभिमन्यू सूर्यवंशी , राम जगताप , अमोल सोनवणे , विशाल गव्हाणे, सागर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली केली.सृष्टी हिने प्रतिस्पर्ध्यावर 5 – 0 अशी सरळ मात केली.
सृष्टी विजय जाधव ही रयत शिक्षण संस्थेत साधना इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असून तिला प्राचार्या रोहिणी सुशील व अंजना भंडारी व इतर स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले.
सृष्टी जाधव ही लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंकित थेऊर पोलीस चौकी येथील पोलीस हवालदार विजय नथू जाधव यांची कन्या असून या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
