थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) लोणी गावातील मस्जिद मध्ये मौलाना महीबुब शेख यांनी ईद उलफित्रच्या नमाजच्या वेळी बयाण केले आपल्या बयाण मध्ये रमजानचे जकात व फित्राचे महत्त्व व कुराण चा दाखले देवुन सर्व जातीधर्माचे सर्व जातीधर्माच्या लोकांशी तसेच प्रत्येक महिलांचे आईसमान अदर केला पाहिजे अशी शिकवण दिली आहे याची माहित दिली.

 

खुदबा पठण करून सर्व व्यापार्यांनसाठी, कामगारांना साठी, जगाचा पोशिंदा शेतकरी बांधवांसाठी तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी दुवा पठण

केले. नमाज पठण झाल्यानंतर लोणी गाव व पंचक्रोशीतील प्रसिद्ध आशा ह. बागुशाहवली रहे. दर्गा वर दर्शन घेण्यासाठी मुस्लिम बांधवांन सहित सर्व

जातीधर्माच्या बांधवांनी दर्गा मैदानावर गर्दीकेली.

एकमेकांना ईदच्या शुभेच्छा गळाभेट घेऊन दिल्या. बच्चे कंपनी विशेष पारंपारिक पोशाखात आकर्षक दिसत होते व ईद्दी मिळाल्यामुळे आनंदाने ईद भेटत होते.

दर्गा ट्रस्टतर्फे वाहिद शेख, फिरोज तंबोली, अस्लम आत्तार, रिजवान तंबोली तसेच सामाजिक कार्यकर्ते शकुरभाई शेख,शौकत तंबोली,गफूर शेख ,ताहेर खान यांनी सर्वाना ईदच्या शुभेच्छा देवुन सामाजिक सलोखा व शांततापूर्ण वातावरणात ईद साजरी करण्याचे आवाहन केले. आलमगीर मस्जिदचे शेरखान इनामदार व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी मस्जिदमध्ये ईदच्या नमाज पठणाचे 2500 लोकांची नमाज पठणाची चोख बंदोबस्त केला असल्याचे माहिती दिली.

णणलोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी साहेब यांनी मस्जिद व दर्गा मैदानावर बंदोबस्त ठेवला व सर्वांना ईदच्या शुभेच्छा देवुन शांतता राखण्याचे आव्हान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *