कदमवाकवस्ती (हवेलीनामा आॕनलाईन) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त लोणी स्टेशन येथे ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी नामुगडे,नासीरखान पठाण व इतर सामाजिक संघटनाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.लोणी स्टेशन येथील भगवा प्रतिष्ठान, जय हिंद ग्रुप,लहुजी शक्ती सेना यांनी संयुक्तरित्या हा उपक्रम राबविला.या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.डॉ.मनोहर डोळे मेडिकल फौंडेशनच्या डॉक्टरांनी परिसरातील १२७ नागरिकांची नेत्र तपासणी केली असता त्यातील ९ नागरिकांमध्ये मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.बाबासाहेबांच्या जयंतीला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या वेळी कदमवाकवस्ती महिला सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड,नवपरिवर्तन फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य नासिर खान पठाण मंदाकिनी नामुगडे,रमेश कोतवाल,अशोक शिंदे,लहुजी शक्ती सेनेचे हवेली तालुका अध्यक्ष विजय सकट उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते ज्ञानेश्वर नामुगडे,अभिजीत बडदे, सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख,रणजीत माने,महेश राठी,सुरज म्हात्रे,प्रशांत चव्हाण,ऋषिकेश कदम,समीर शेख, निलेश चांदणे यांनी केले होते.या कार्यक्रमास समता नगर, इंदिरानगर,शिक्षक कॉलनी मधील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
