थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गेली अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झाल्यानंतर आज सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या.तापमाणाचा पारा नमस्कार उंचावत गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती घामाच्या धाररा वाहत होत्या.राज्यात विज टंचाई निर्माण झाल्याने भारनियमन होत आहे त्यामुळे नागरिक बेहाल झालेले असताना हा पाऊस आल्हाददायक वाटत होता.
हवामान विभागाकडून येत्या दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्ता वर्तवण्यात आली होती त्यानुसार गेली दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.आज सायंकाळी पूर्वैकडून ढगांची दाटी वाढली व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसाने थोडी पळापळ झाली पण तो सुखावणारा क्षण होता.
जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला लाईट नसली तरीही एक सुखद अनुभव येत होता.
