पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)

दोन वर्षांपूर्वी आलेल्या करोना संसर्गमुळे जनजीवन विस्कळित झाले असताना अनेकांचे उद्योग – व्यवसाय, नोकरी बंद झाले आहेत. जीवनमान पूर्वपदावर येत असले तरी अनेक तरुण – तरुणी अजूनही बेरोजगार आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँगेस व शिवराज्य समूह यांच्या वतीने दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी समृद्धी लॉन, नऱ्हे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँगेसचे सरचिटणीस भुपेंद्र मुरलीधर मोरे यांनी सांगितले.

शहरात सध्या अनेकांना नोकरीचा प्रश्न भेडसावत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या रोजगार मेळाव्यात राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यांचे एच आर प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत. यातून आपल्या भागातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे, असे भूपेंद्र मोरे यांनी सांगितले.

रोजगार मेळाव्यात पाचवी ते पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील ३० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी असणार आहेत. शहर व परिसरातील युवक व युवतींनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरावा.www.mahajobz.com/bhupendramore असे आवाहन आयोजक भूपेंद्र मोरे यांनी केले आहे. अधिक महितीसाठी संपर्क- 7387447337, 9822412540

या दिवशीच प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप तसेच रक्त तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गतीमंद व अनाथ मुलांना खाऊ वाटप देखील करण्यात येणार असल्याची माहिती भूपेंद्र मोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *