लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन)     भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथील ऑक्सिजन पॉईट क्र ३ येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ :३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोणी काळभोर सरपंच माधुरी काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले , उद्योजक शेखर काळभोर यांच्या वतीने कोळपे वस्ती येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रीन फाउंडेशन ऑक्सिजन पॉईट क्र ३ या ठिकाणी उद्योजक प्रतिक कोळपे यांच्या वतीने १३१ वृक्ष लावण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे या अनुषंगानेच. साधना बॅक विद्यमान संचालक बाळासाहेब कोळपे यांच्या वतीने पाईप लाईन, ठिंबक सिंचन करण्यात आले, कै.तात्यासाहेब खेडेकर यांच्या स्मरणार्थ राजेंद्र खेडेकर यांच्या वतीने लोणी काळभोर येथील बौध्द वस्ती येथील ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली.

शिवराज मनोज काळभोर यांच्या वतीने लोणी काळभोर येथील पहिली ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी लोणी काळभोर सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर मा.उपसरपंच ज्योती काळभोर, मा.उपसरपंच ललिता राजेंद्र काळभोर ,ग्रा.सदस्य भारती काळभोर, जालिंदर रूपनर,विजय बोडके ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे,बाबासाहेब यादव, निलेश काळभोर, जीवन जाधव, बाबासाहेब घोडके,सिद्धार्थ खंडागळे उपस्थित होते.

अशा पद्धतीने ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने जयंती साजरी करण्यात आली .उपस्थित मान्यवर याचे ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी आभार मानले तर विजय बोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *