सोमेश्वरनगर ( हवेलीनामा ऑनलाईन )
आंतरराष्ट्रीय धावपटू व बारामती चे तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ खंडु लकडे यांची लातुर जिल्हा क्रिडा अधिकारी पदी पदोन्नती..
करंजेपुल ,सोमेश्वरनगर चे रहिवासी असलेले व भारताला अशियाई स्पर्धेत पदक मिळवुन देणारे सेनादलातील सुभेदार लकडे यानी गेले सहा वर्ष मुंबई,अंधेरी ,कुर्ला ,भोर वेल्हे ,पुरंदर व बारामती तालुक्यात तालुका क्रिडा अधिकारी म्हणुन काम केले आहे .
गेल्या वर्षी जिल्हा क्रिडा अधिकारी पदासाठी परिक्षा झाल्या होत्या त्यांचा अनुभव व गुण यामुळे त्यांची लातुर जिल्हा क्रिडा अधिकारी पदी निवड झाली आहे .
महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव स्वाती नानल यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सेवाजेष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार राज्यातील १४ क्रिडा अधिकार्यांची पदोन्नती जाहीर केली आहे.
जगन्नाथ लकडे हे बारामती मधुन निवड झालेले एकमेव जिल्हा क्रिडा अधिकारी ठरले आहेत त्यांच्या निवडीचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे .अतिशय प्रतिकुल परिस्थीतीतुन त्यानी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲथलीट मधे पदके मिळवुन दिली आहेत .
