थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने कुंजीरवाडी(ता.हवेली) येथील जुन्या ग्रामपंचायत समोर घेतला यात प्रामुख्याने हदयविकार तपासणी,मधुमेह,उच्चरक्तदाब,स्ञीरोग तपासणी,गरोदर माता तपासणी,नेञरोग तपासणी,प्रयोगशाळा तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहान डाॕ लुकडे यांनी केले होते याला प्रतिसाद देत परिसरातील जेष्ठ नागरिकांनी यावेळी विविध तपासण्या करुन औषधे घेतली यात माहिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर होता शिबिराचे उद्याटन कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड यांनी केले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर,सोरतपवाडीच्या सरपंच संध्या चौधरी,नायगावचे सरपंच सुरज चौधरी, माजी सरपंच सुनिता धुमाळ उपसरपंच चंद्रकांत मेमाणे,श्रीनाथचे चेअरमन संदीप धुमाळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बापू घुले,माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, माजी सदस्य विकास निगडे, शिवसेनेचे स्वप्निल कुंजीर, मुंबई महापौर कैसरी आबा काळे, शिवसेनेचे सुभाष कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल,सागर निगडे,हरेश गोठे,अर्चना धुमाळ,पोलिस पाटील मिलिंद कुंजीर,ग्रामसेवक बाळासाहेब कांबळे,प्रल्हाद पवार,भाजपाचे आदेश जाधव,पर्यावरण समितीचे विशाल वाईकर,आनंद वैराट ,गणेश शेलार,राहूल धुमाळ उपस्थित होते या शिबिराला गावातील जेष्ठ नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला तब्बल दोनशे दहा नागरिकांनी विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या करुन औषधे घेतली यावेळी कुंजीरवाडीचे आरोग्य अधिकारी महेबूब लुकडे, शिल्पा दलाल,आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार,संजय औधकर,विजयमाला शेलार,सुरेश दिवार,सुनिल वाघमारे,सारिका भिसे यांनी तपासणी केली तसेच आशा सेविका यांनी शिबिरात मोलाची साथ दिली तसेच विश्वराज हाॕस्पिटलच्या डाॕक्टर तसेच त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *