थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) शारदाग्राम अरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद,पुणे अरोग्य विभाग यांच्या वतीने थेऊर येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवारी आयोजीत करण्यात आले असून ग्रामस्थांनी यात सहभाग घेऊन आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेबूब लुकडे यांनी केले आहे.

      हे सर्व रोग निदान व तपासणी शिबिर येवला येथील चिंतामणी विद्या मंदिर येथे येत्या मंगळवारी म्हणजेच जागतिक महिलादिनी दिनांक 8 मार्च रोजी सकाळी दहा ते दोन या दरम्यान संपन्न होणार आहे तरी ग्रामस्थांनी यात अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आरोग्य विभागाने सांगितले आहे  या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांची तपासणी तसेच नेत्ररोग तपासणी, गरोदर माता व महिलांची तपासणी, मौखिक आजार तपासणी ईसीजी तपासणी तसेच कोविड 19 लसीकरण, प्रयोगशाळा व औषध वाटप केले जाणार आहे. शिबिराला येताना आपले जुने रिपोर्ट कार्ड, फाईल घेऊन येणे जेणेकरून निदान करणे सोपे होईल असे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी चे आरोग्य अधिकारी डॉ महेबूब लुकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *