थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) तीर्थक्षेत्र थेऊर येथे पौराणिक महत्त्व असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त येथील पुरातन शिवालयात स्थानिक व परिसरातील नागरिकांनी शंकराचे दर्शन घेतले.

     अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊरमध्ये खडकेश्वर सिध्देश्वर यासह पंचलिंगाचे मंदिर प्रसिद्ध आहेत दरवर्षी श्रावणात तसेच महाशिवरात्रीनिमित्त या पुरातन मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात पहाटे पाच वाजल्यापासून शंकराच्या मंदिरात महापुजा दुग्धाभिषेक चालू होते तर काही शिवभक्त बिल्वपत्र घेऊन दर्शनासाठी पोहोचले.
         प्रत्येक देवतांची पंचायतन पुजा केली जाते त्यात विष्णू पंचायतन,शिव पंचायतन याचे विशेष महत्त्व आहे त्यापैकीच एक शिव पंचायतन थेऊरक्षेत्री असल्याचे दिसते अशा प्रकारची मंदिर व्यवस्था कुठेही असल्याचे ऐकिवात नाही त्यामुळेच या ठिकाणास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
          येथील श्री चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाने देवालयात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला यात हभप ज्ञानोबा कुंजीर, हभप एकनाथ तारु,लक्ष्मण कुंजीर, सुदाम काळे, आनंद काकडे,सुरवसे, बाळासाहेब गिरमकर, विजय सोनवणे,राहुल लोंढे,गोरख काळे,लक्ष्मण कुंजीर आदी उपस्थित होते.
       तांबेवस्ती येथील शिवमंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *