पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. हवामानाच्या लहरीपणामुळे शेती नुकसानीची होऊ लागली आहे. देशात नव्वद टक्के अन्न पोटाची खळगी भरण्यासाठी, तर केवळ दहा टक्केच अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वापरले जाते. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात संधी आहे. अन्न तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतीचे विज्ञान समजून शेतीशी निगडीत प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी ज्ञान आत्मसात करावे. शेती आणि शेतकऱ्यांना तारण्यासाठीच प्रक्रिया उद्योग महत्वाची भूमिका बजावेल, अशी आशा कृषी अधिकारी गणेश सुरवसे यांनी व्यक्त केली.
         एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फुड टेक्नॉलॉजी यांनी ग्राम दत्तक योजनेत हवेली तालुक्यातील वावाडे-बोल्हाई ही ग्रामपंचायत दत्तक घेतली आहे. या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी या गावचे सरपंच दीपक गावडे, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, ग्रामसेवक अनिल बगाटे, एमआयटी स्कूल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ. अंजली भोईटे, प्रा. सुजाता घोडके, प्रा. कविता माने, प्रा. डॉ. निलेश कर्डिले, प्रा. गणेश भावसार, अनुपमा देवकाते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
          गणेश सुरवसे म्हणाले, की, हवामानाचा लहरीपणा आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे शेती नुकसानीची होत चालली आहे. शेतीमाल हा नाशीवंत असल्यामुळे त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात संधी आहे. एमआयटी स्कूल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शेती पूरक उद्योग आणि अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊन रोजगार निर्मित होईल.
           सरपंच दीपक गावडे म्हणाले, की एमआयटी स्कूल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या माध्यामातून ग्राम दत्तक योजनेत तीन वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत. येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या बांधावरून कार्यानूभव देण्याचा कार्य होत आहे. हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे ठरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *