पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) महान योद्धा, महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा स्वाभिमान असणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथे विविध कार्यक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कदमवाकवस्ती   ग्रामपंचायतीच्या सरंपच गौरी गायकवाड यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
      दरम्यान अटल इक्युबेशन सेंटर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे स्टार्ट अप सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन आणि एमआयटी सेंटर फॉर फ्युचर स्किल एक्सलन्सचे संचालक प्रा. सुराज भोयर आणि विद्यार्थ्यांतर्फे महाराजांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली.
        यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य युंगधर (सनी) काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम काळभोर, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, चितरंजन गायकवाड, नंदकुमार काळभोर, प्रशांत काळभोर,राजेंद्र काळभोर, अमित काळभोर,  मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. रामचंद्र पुजेरी, समन्वयक डॉ. अतुल पाटील यांच्यासह दोन्ही ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांच्या सर्व विभागांचे डीन, डायरेक्ट, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.
      श्रीकांत अनिल शिर्के आणि सहकारी यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या पराक्रमी कामगिरीवर भाषणे केली. पथकांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या भव्य अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *