पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) ग्रामीण भागात  आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे गेल्या तीन महिन्यापासून रखडलेली मानधन तात्काळ द्यावे अशी मागणी राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

      पुणे जिल्ह्यात सुमारे तीन हजारापेक्षा अधिक आशा सेविका आणि गटप्रवर्तक आहे त्यांच्याकडून आरोग्यसेवे संबंधित कामे करून घेतली त्यांना मानधन दिले जाते तसेच प्रशिक्षणासाठी प्रत्येक दिवशी दोनशे रुपये या प्रमाणे मानधन देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु अद्याप नियमित व वाढीव मानधन देण्यात आलेले नाही येत्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रात आशा सेविका मदत करतात त्यांचा ही मोबदला देण्यात यावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.
     कोरोना संदर्भातील व इतर आरोग्य विषयक कामे या आशा सेविकांना करावी लागत आहेत मात्र मानधन देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे असा आरोप या आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे सचिव श्रीमंत घोडके यांनी केला यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी सांगितले की आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून साडेतीन कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे जानेवारीअखेरपर्यंत मानधन दोन दिवसात बँक खात्यात जमा होईल तसेच पुढील लसीकरणाची मानधन सप्टेंबर अखेरपर्यंत जमा केले जाईल तर उर्वरित मानधन शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जमा केले जाईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *