पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)  राज्य शासनाने किराणा दुकानात व सुपर मार्केट मधून  वाईन विक्रीला परवाणगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून यावर चौफेर टीका होऊ लागली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयाविरुद्ध उपोषण करणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर शासकीय पातळीवर हालचाली चालू झाल्या शासनाकडून एक सचिव यांनी भेट घेऊन  उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली

शासनाकडून अण्णा हजारे यांना आश्वासन देण्यात आले की हा निर्णय  सर्वसामान्य  नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून त्यावर निर्णय घेण्यात येईल त्यानंतर त्यांनी उद्यापासून राळेगणसिद्धी येथे करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे ग्रामसभेत जाहीर करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *