पुणे ( हवेलीनामा ऑनलाईन) ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक बांधिलकी असून हवेली तालुक्यातील पूर्व भागातील महिलांच्या बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठाण चे संस्थापक दत्तात्रय काळे यांनी सांगितले
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीक्षेत्र थेऊर येथे दर चतुर्थीला चिंतामणी महोत्सवाचे आयोजन करून त्यामध्ये महिलांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महोत्सव दि १६ फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे यासाठी आज शनिवारी मंडप पूजन करण्यात आले यावेळी यशवंत चे माजी संचालक पांडुरंग काळे,माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे,गावच्या सरपंच शीतल काकडे,लोणी काळभोरचे माजी सरपंच चंदर शेलार,प्रतिष्ठाण चे संस्थापक दत्तात्रय काळे,स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैराट, ह भ प एकनाथ महाराज तारू, विजय सोनवणे, आनंद तांबे,बाळासाहेब गिरमकर,बचतगटातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी पांडुरंग काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपल्या गावच्या विकासासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन कामे करावीत चिंतामणी महोत्सवातून महिलांना स्वयंरोजगार मिळेल त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील त्याच्या कुटुबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल यातूनच गावचा विकास साधला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले