पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हडपसर येथील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ओ बी सी मोर्च्याच्या शहर उपाध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी हडपसर सासवड तसेच काळेपडळ रस्त्यावर होणारी वाहनांची वर्दळ त्यामुळे पादचारी नागरिकांना होणारा त्रास त्यामुळे तुकाई दर्शन शनी मंदिर व काळेपडळ चौकात डांबरी गतिरोधक बसविण्यात यावेत तसेच शनी मंदिर चौकात भुयारी मार्ग तर लेक्सीकन शाळेसमोर सबवे तयार करण्यात यावा यासाठी महानगरपालिकेकडे पत्र देऊन मागणी केली होती यावर प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली
यावेळी स्मिता गायकवाड यांना भोसले यांनी भुयारी मार्गासाठी आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत सतीश दुधाळ व गुरुनाथ हडदरे उपस्थित होते.
सासवड महामार्गावर गेल्या काही दिवसात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे सामान्य पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे तर वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत त्यामुळे चौकात भुयारी मार्ग तयार करणे आवश्यक आहे यासाठी स्मिता गायकवाड यांनी मागणी केली होती.
