पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे जिल्ह्याचे मानबिंदू वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिभावंत उद्योजक सायरस पुनवाला यांना देशातील बहुमोल असा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून पुनवाला यांनी या क्षेत्रात अतुलनीय मिळविलेल्या यशाची ही पोच आहे.
सायरस पुनवाला यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय उद्योग क्षेत्रात पदार्पण केले त्यांनी हडपसर पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून लसीकरण क्षेत्रात अनेक संशोधन केले जागतिक पातळीवर ही संस्था नावारूपाला आली या संस्थेने अनेक दुर्धर आजारावर औषध तयार केले, लहान मुलांना देण्यात येणाऱ्या अनेक लसी येथे तयार होतात.
जगात कोरोनाची लाट पसरली आणि मानवजातीला मोठे संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली या आणीबाणीच्या परिस्थितीत पुनवाला यांनी या विषाणूवर संशोधन चालू केले आणि त्यावर प्रभावी लस तयार केली ही लस आपल्या देशाबरोबरच जगातील अनेक देशात पुरवली जात आहे त्यांचे हे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना भारत सरकारचा मनाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला यामुळे अनेक भारतीय नागरिकांना याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.
