पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टरीलरी प्रकल्पात आग लागली त्यामुळे बरेच नुकसान झाले असण्याची शक्यता आहे हा कारखाना सन २०११ पासून बंद अवस्थेत आहे,या आगीत किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही

        यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाल्यापासून याकडे कोणाचेही लक्ष नाही केवळ काही तळमळीचे जेष्ठ सभासद यासाठी नेटाने लढत असून ही लढाई न्यायालयात चालू आहे त्यामुळे गेली ११ वर्षे या कारखान्याचे लचके तोडण्यात येत असून कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे ज्या बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला त्यांची सुरक्षेची जबाबदारी असताना केवळ काही सुरक्षा रक्षकांच्या जीवावर ही करोडो रुपयांची संपत्ती सडत आहे,सोमवारी सायंकाळी येथील डिस्टरीलरी प्रकल्पात आग लागली त्यानंतर सुरक्षा रक्षक यांनी माजी संचालक पांडुरंग काळे यांना याची कल्पना दिली त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलास पाचारण केले त्यांच्या मदतीने ही आग विजवण्यात आली.
           यावेळी थेऊर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी, एस पी ओ, कारखान्याचे सुरक्षा रक्षक यांचे  सहकार्य लाभले.
         ही आग लागली किंवा कोणी जाणीवपूर्वक लावली याची चौकशी लवकरच पोलीस करतील व माहिती समोर येईल जर यात कोणी दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *