पुणे (हवेलीनामा वृत समूह)  गेल्या काही दिवसात पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गुटक्यावरून राज्यात याची मोठी समांतर बाजारपेठ निर्माण झाली असून राज्यात केवळ यावर प्रतिबंध आहे परंतु अन्न व औषध प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे सर्वत्र अगदी सहज याची खुलेआम विक्री होते आहे मग त्या बंदीचा उपयोग काय असा सर्वसामान्य प्रश्न उपस्थित करत आहेत.

       महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटखा व पान मसाल्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अलीकडे कुठे आणि काय काम करते हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण गुटख्यावर केवळ कागदोपत्री प्रतिबंध आहे परंतू  प्रत्यक्षात सर्रासपणे याची विक्री चालू आहे. शहरापासून गावपातळीवर सर्वत्र याची उपलब्धता आहे मग अन्न व औषध प्रशासन नेमकी कोणती भूमिका बजावत आहे

           राज्यात गुटख्याच्या विक्री व साठवणुकीवर प्रतिबंध घालण्यात आला असला तरीही दक्षिणेतील राज्यातून महामार्गाने लाखो रुपयांचा माल राज्यात दाखल होतो आहे म्हणजे यावरील बंदी ही केवळ दिखाव्या पुरतीच राहिली आहे यावर प्रतिबंध बसणार नाहीत हे वास्तव सर्वसृत झाले आहे शासकीय यंत्रणा आपले कर्तव्य चोख बजावण्यात कमी पडत असल्याने ही परिस्थितीनिर्माण झाली आहे.
          केवळ पोलिसांनी धाडी टाकल्या नंतर जप्त केलेल्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात नुकत्याच जप्त केलेल्या मालात हडपसर, इंदापूर, राजगड व काळ थेऊर फाट्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ या पोलिसांनी केलेली कारवाई ही ताजी उदाहरणे आहेत यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला पण याच्या मुळापर्यंत कधी पोहचणार, यावर कडक कारवाई कधी व कोण करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *