पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पै. दत्ताञय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठाणच्या २०२२च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पावर यांच्या हस्ते नुकताच पार पडला.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हवेलीतील तरुण होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोच्छहन दिले जाईल,कोरोना महामारीमुळे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करून उद्योग सुरु करण्यासाठी मदत केली जाईल.

शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी देखील या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले, यावेळी प्रतिष्ठाणच्या माध्यामातून पूर्व हवेलीत सुरु असलेल्या सामाजिक, शैक्षणिक,कला क्रिडा,तसेच शेतविषयक तसेच माहिला बचत गटांच्या बाबत प्रतिष्ठणच्या कार्याचे आमदार पवार यांनी कौतुक केलं सामाजितील गोरगरीब घटकांची कामे प्रतिष्ठच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करुन मदत करत असल्याचा यावेळी सांगितले
यावेळी बोलताना प्रतिष्ठणचे अध्यक्ष दत्ताञय(आबा ) काळे यांनी आगमी काळात प्रतिष्ठाणच्या वतीने माहिला बचत गट तयार करत असलेल्या वस्तूना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच त्यांच्या तयार केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याचा मानस असून लवकरच माहिला बचत गटानी तयार केलेल्या मालाचे प्रदर्शन भरवणार आहे तसेच क्रिडा क्षेञात अनेक उदोन्मुखी खेळाडू तसेच गरीबीतून शालेय शिक्षण घेत असलेल्या पाल्यांची आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले महिला बचत गटाच्या बैठक घेऊन त्यांना येणाऱ्या अडीअडचणीची माहित घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार तसेच थेऊर व परिसरातील महिला बचत गटासाठी कायमस्वरूपी चतुर्थीस बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांनी याचा फायदा घेऊन नवीन उत्पादने तयार करावीत व आपले उत्पन्न वाढवावे असे पै आबा काळे यांनी सांगितले.
