पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना स्वास्थ्य लाभावे यासाठी आज थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका तसेच आगलावे बंधू पुजारी व ग्रामस्थ यांच्या वतीने महापूजा करून महाआरती घेण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच भाविक उपस्थित होते.
चिंतामणीचे पुजारी महेश गुरुजी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश धुमाळ, सचिव विजय रणदिवे, सहसचिव दिगंबर जोगदंड, सहदेव खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेकजणांना संसर्ग झाला परंतु रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्याची वेळ आली नाही ही सौम्य लाट असल्याचे सांगितले जाते परंतु गाणकोकीळा लता मंगेशकर यांना गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली त्यांचे वय अधिक असल्याने त्यांना मुंबईत ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांना पुढे न्यूमोनियाची लागण झाली त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही सुधारणा होत नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते त्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुका यांनी आज थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीची पूजा करून महाआरती घेण्यात आली व लता मंगेशकर यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवाला साकडे घातले.
