पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) नागरिक सर्दी खोकल्याने बेजार झाले असून खाजगी दवाखान्यात मोठी गर्दी तर शासकीय यंत्रणा लसीकरण कार्यक्रमात व्यस्त त्यामुळे सध्यस्तीतीत नेमके रुग्ण कोणते याचा संभ्रम निर्माण झाला आहे.

     पुण्यात कोरोना रुग्णाची संख्या दररोज नवीन विक्रम करत आहे तर ग्रामीण भागातील नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल कोणताही अधिकारी माहिती देत नाही त्यामुळे परिसरात वाढलेल्या रुग्णाची तपासणी कशी केली जाणार
       गेली महिनाभरापासून वातावरणातील चढउतार चालू असल्याने अनेकांना सर्दी खोकला ताप थंडी असे आजार जडले आहेत यावर गावातील घरोघरी जाऊन याची माहिती घेऊन नेमकी कोणती लक्षणे दिसतात त्यावर चाचणी करून औषधोपचार करण्यात आला पाहिजे
      गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आलेख उंचावत असून चाचण्या होणे आवश्यक आहे तर जे रुग्ण कोरोना बाधित आहेत ते गृहवीलगिकरणात असणे गरजेचे असताना ते बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत त्यामुळे भविष्यात हा आकडा आणखी मोठा आला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते ही लाट तशी तिव्र स्वरूपाची नसली तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सध्या मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आली आहे त्या धर्तीवर पुण्यात पावले उचलणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *