पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  गेली अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर घातलेली बंदी नुकतीच उठवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे या आनंदावर विरझन घातले गेले याला नवसंजीवनी देण्यासाठी हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक शेतकऱ्यांसाठी पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ऑनलाइन बैलाची रॅम्प वाक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यास्पर्धेचा निकाल दि ३ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येईल तर पारितोषिक वितरण दि ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे अशी माहिती मुंबई महापौर केसरी पै दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी दिली.

          कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले यातील अनेक शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या बैलांची देखभाल व संगोपन केले परंतु मधल्या काही काळात या शर्यतीवर बंधने घालण्यात आली त्यामुळे ही स्पर्धा चालू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला त्यानंतर नुकतीच यास काही अटीवर परवानगी देण्यात आली परंतु कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता या स्पर्धा काही काळासाठी थांबवण्यात आल्या.
          यावर पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या वतीने ऑनलाइन बैलाची रॅम्प वाक स्पर्धा आयोजित केली आहे यात तीन पारितोषिके दिली जाणार आहेत पहिले पारितोषिक हवेलीचा सर्जा राजा म्हणून मानचिन्ह (ट्रॉफी),दुसरे पारितोषिक सन्मान चिन्ह(ट्रॉफी) व प्रशस्तीपत्र,तिसरे पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाईल तर उतेजनार्थ पाच क्रमांक काढले जाणार आहेत.
         यासाठी बैल किंवा बैलजोडी यांचा १ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून पाठवावा यामध्ये कुटुंबातील सदस्य असतील तर अधिक प्राधान्य दिले जाईल,हे व्हिडीओ दि २१ जानेवारी २०२२ पासून दि २ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ : ०० वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत, सर्व व्हिडीओ व्हाट्सएप ९०२२६६७४९४ या क्रमांकावर पाठवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *