टीम (ऑनलाइन हवेलीनामा) गेली दीड वर्षांपासून अंगवळणी पडलेली मुखपट्टी मास्क हळूहळू गायब होत असून कोरोनाची लाट ओसरली की आपल्याला त्याचे विस्मरण झाले हे कळेना.सध्या कोरोनाची रुग्ण संख्या घटली असली तरीही निर्बंध कायम आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला याचा विसर पडलेला दिसतो बहुतेक जण बिनधास्त फिरताना दिसतात

           कोरोना महाणारीला रोखण्यासाठी शासनाने त्रिसूत्री घालून दिली आहे यात मुखपट्टी, सामाजिक अंतर व वारंवार हात धुणे परंतु अलीकडे सार्वजनिक जीवनात वावरताना नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसतात विशेषतः सार्वजनिक कार्यक्रमात फोटो काढताना कोणाच्याही तोंडावर पट्टी नसतेच
      कोरोना होऊ नये याची जबाबदारी केवळ शासनाने घेतली आहे का यात आपली भूमिका काय असावी हे आपण कधी जाणणार ! आपल्यावर कायदेशीर कारवाई केली तरच याची आठवण होणार का ? हा प्रश्न आपण स्वतःस विचारायला पाहिजे.कोरोना साखळी तुटली मग पुन्हा आपल्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शिस्त बाळगली पाहिजे.लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न अपेक्षित आहे.
        कोरोनापासून आपला व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तरीही नागरिक म्हणून कर्तव्यात कुठे कमी पडू नये सध्या लसीकरण मोहीम जोरात चालू आहे गावोगावी लसीचे जास्त डोस उपलब्ध करून दिले जात आहेत केवळ आपले लसीकरण करून घेणे हे आपले परम कर्तव्य म्हणून यात आपली भूमिका पार पाडावी.
       
2 thoughts on “तोंडावरील मुखपट्टी होतेय गायप कोरोनाचा पडलाय विसर”
  1. वास्तव आहे हे खरोखर लोक करोन। गेला असे समजून वागत आहेत हे धोकादायक आहे.
    उत्तम बातमी आहे . 💐💐💐

Leave a Reply to sharad pujari Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *