सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेची राज्यव्यापी विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवार दिनांक 14 मार्च व रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी श्रीलीला रिसॉर्ट कास पठार रोड येथे होणार असल्याची माहिती राज्य कार्यकारी समितीचे सदस्य हमीद दाभोलकर मिलिंद देशमुख राहुल थोरात यांनी दिली.

या बैठकीचा उद्घाटन समारंभ पुरोगामी विचाराचे प्रबोधनकार ह. भ. प .डॉक्टर सुहास फडतरे महाराज( सातारा) यांचे हस्ते आणि ह भ प देवदत्त परुळेकर (वेंगुर्ला) यांचे उपस्थितीत होणार आहे ,यावेळी वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन या देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेल्या पुस्तक संचाचे प्रकाशन होईल.

राज्यभर वर्षभरात राबवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे अहवाल वाचन आणि त्यावर चर्चा होईल. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांमध्ये विविध विभागाच्या कामाचे नियोजन चर्चा आणि आगामी वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याबाबत तसेच राज्यव्यापी महिला परिषद घेण्याबाबत चर्चा केली जाईल. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजता बिंदू माधव खरे पुणे यांचे डॉक्टर हमीद दलवाई आणि मेहरूनिस्सा दलवाई यांच्या कार्यावर आधारित नाट्यवाचन होईल.

रविवारी वार्तापत्र आणि प्रकाशन विभाग यांच्या मार्फत आगामी वर्षात प्रकाशित करणारे येणाऱ्या पुस्तकांविषयी चर्चा केली जाईल तसेच नवीन कार्यकारणी निवडली जाईल. बैठकीच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड सुभाष पाटील (विटा) क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू यांचे मार्गदर्शन होईल .बैठकीसाठी गोंदिया गडचिरोली नागपूर पासून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत तसेच बेळगाव आणि गोवा या ठिकाणाहून 300 कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे तसेच राज्य कार्यकारी समितीचे मुक्ता दाभोलकर अण्णा कडलसकर रामभाऊ डोंगरे सम्राट हटकर विनोद वायंगणकर उपस्थित राहत आहे अशीही माहिती दाभोलकर यांनी दिली महाराष्ट्र अंनिसच्या पुढील राज्य कार्यकारिणीची निवड देखील या कार्यक्रमाच्या मध्ये केली जाणार आहे डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी ज्या सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र अनिसचे काम सुरू केले तिथे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सातारा जिल्ह्यातील उदय चव्हाण डॉ दीपक माने शंकर कणसे वंदना माने भगवान रणदिवे प्रशांत जाधव कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *