पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात वाढता दबाव पाहता राज्यशासन मुख्यमंत्र्याकडे शाळा सुरू करण्याच्या संदर्भात प्रस्ताव पाठवला असून मुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय घेतील आणि येत्या सोमवारपासून राज्यातील स्थानिक प्रशासन निर्णय घेऊन शाळा सुरू होण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहे
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लाटेच्या तिसऱ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान यावर पालकांची प्रचंड नाराजी कारण अनेक ठिकाणी होणारी गर्दी यावर नियंत्रण होत नाही केवळ शाळा बंद अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया आल्याने राज्य शासना वरती मोठा ताण आला यावर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात तीन प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असून यावर ते लवकरच निर्णय घेऊन राज्यातील शाळा सुरू होण्याचे मार्ग मोकळे झाले आहे आहे येत्या सोमवारपासून स्थानिक प्रशासनाला अधिकार दिल्याप्रमाणे तेथील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याच्या सूचना लवकरच पारित होण्याची शक्यता आहे
