पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तरीही समाज यातून काहीच बोध घेत नाही परंतु एखाद्याने मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच यात यश मिळत हे यवतमाळ येथील चिमुकल्याने करून दाखवलं

       अंकुश हा केवळ अकरा वर्षे वयाचा त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन जडलेलं यावर काय व्युक्ती करायची हे या छोट्याश्या अंकुशच्या डोक्यात सारखा विचार येत असे शेवटी तो थेट पोहोचला गावच्या ग्रामसभेत आणि तेथे त्याने आपली कैफियत मांडली त्याचे धारिष्ट्य पाहून गावातील मंडळी अवाक झाली त्यांनी त्याच्या वडिलांना ग्रामसभेत बोलावून घेतले व दारू सोडण्याच्या सूचना दिल्या आणि शिक्षा म्हणून त्यांना उठाबशा काढायला लावल्या,वडिलांना त्यांची चूक उमगली आणि त्यांनी आपल्या मुलाला वचन दिले की पुन्हा दारूला स्पर्श करणार नाही
         अंकुशने आपल्या नावाप्रमाणेच व्यसणावर अंकुश ठेवण्यात यशस्वी झाला त्याने आपल्या जीवनातील ध्येय डोळ्यासमोर देऊन त्याच्या बहिणीला डॉक्टर बनविण्याचे ठरविले आहे यात त्याचे वडीलही त्याला साथ देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *