पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  बार्शीतील एका ठगाने नागरिकांना कोट्यावधींचा गेंडा घालून फरार झाला अल्पावधीत भरपूर पैसा मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लोकांकडून लाखो रुपये गोळा केले व गावाला जातो असे सांगून धूम ठोकली

       फसवणूक प्रकरणी बार्शी पोलिसात तक्रार दाखल झाली असून विशाल फटे असे या ढगा चे नाव असून त्याने नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत आपण ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देतो असे सांगून लोकांकडून लाखो रुपये उकले.
        विशाल फटे हा गेली १० ते १५ वर्षापासून ट्रेडिंग करत असल्याचे भासवून नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत असे सध्या तो फरार असून त्याच्या विरोधात तक्रारीचा पाऊस पडताना दिसत आहे या तक्रारदारात उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, उद्योजक याचा समावेश आहे.काहींनी तर आपले घर गहाण ठेऊन काही जणांनी वैयक्तिक कर्ज घेऊन पैसे गुंतवले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *