पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे लोणी काळभोर येथील श्रीक्षेत्र रामदरा येथील श्रीराम मंदिर मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दी मुळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
कोरोनाची लाट देशासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेली असून कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दिसत आहेत राज्य शासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी ही नियमावली लावून दिलेली आहे त्यामुळे गर्दी टाळण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आली आहे पर्यटन स्थळे बंद केली असून धार्मिक ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांसह पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र रामदरा येथे भाविकांनी मकर संक्रांति दरम्यान गर्दी करू नये यासाठी ग्रामपंचायत लोणी काळभोर व रामदरा शिवालय देवस्थान यांच्या वतीने भाविकांनी या परिसरात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी हे ठिकाण मकर संक्रांति दरम्यान बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे त्यामुळे येथे भाविकांनी जाऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले
