पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   देशात कोरोना रुग्ण संख्येत आज मोठी वाढ झाली असून तब्बल १ लाख ९४ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे यात एकट्या महाराष्ट्रातील ४६ हजार ७२३ तर दिल्लीत २७ हजार ५६१ एवढे रुग्ण नोंदवण्यात आलेत

          राज्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या कमी होताना चे चित्र होते त्यामुळे नागरिकात थोडा दिलासा वाटत होता परंतु आज अचानक रुग्ण संख्या 46 हजारावर पोचली आणि त्यामुळे पुन्हा धडकी निर्माण करणारी ही संख्या दिसून आली गेली दोन दिवस मुंबईत सातत्याने कमी होणारे रुग्णसंख्या आज पुन्हा सोळा हजारावर जाऊन पोहोचली तर पुण्यात आज तब्बल चार हजार ८५७ नवीन रुग्णांची नोंद झाली यामुळे ही तिसरी लाट अधिक भयानक स्वरूप निर्माण करणार हे यावरून स्पष्ट होते नागरिकांनी ही तिसरी लाट सहज न घेता गांभीर्याने घेण्याची गरज आहे
            या तिसर्‍या लाटेत राजधानी दिल्ली मोठ्या प्रमाणात संक्रमित होत असून येथे दररोज रुग्ण संख्या वाढत आहे आज राजधानी दिल्ली २७ हजार ५६१ नवीन कोरणा रुग्ण नोंदवले गेले विशेषतः संसद भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संक्रमित झालेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *