पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) स्मित सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा ओबीसी पुणे शहर मोर्चाच्या उपाध्यक्ष स्मिता गायकवाड यांच्या कार्य अहवाल व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा त्याच प्रमाणे वेबसाईटचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथील त्यांच्या कार्यालयात झाले.
यावेळी पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष बंडू कचरे उद्योजक तुषार गायकवाड शुभम दांगट गोपीनाथ हडदरे,हडपसर विधानसभा चिटणीस संगीता पाटील उपस्थित होते.
स्मिता गायकवाड यांनी अनेक उपक्रम राबवून महिलांना वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षणाची, स्वावलंबी बनण्यासाठी लागणाऱ्या मदतीची सोय केली तसेच पक्षाच्या माध्यमातून हडपसर परिसरात अनेक कामे केली आहेत.यासाठी माजी आमदार योगेश टिळेकर यांचे सहकार्य मिळत असते असाच रोजगार मेळावा आयोजित करून तरुण व बेरोजगार असणाऱ्या गरजुसाठी संधी उपलब्ध करून दिली
