लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने शासनाकडून त्रिसूत्री चा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करत आहेत विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मुख्य पट्टी वापरणे बंधनकारक केलेले आहे, यांना याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका, लोणी काळभोर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी स्टेशन येथील चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क व गुलाब फूल देऊन त्यांना याचे महत्व सांगण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जगात सर्वत्र हाहाकार माजवला असून आपल्या देशात सध्या दररोज पावणेदोन लाख बाधित रुग्ण समोर येत आहेत तसेच राज्यातील रुग्ण वाढीचा दर दिवसागणिक वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कडक केले आहे यात सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क बंधनकारक केलेला आहे त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होणार असून नागरिकांनी याचे पालन करावे अशी अपेक्षा आहे परंतु अनेक जण याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, दिगंबर जोगदंड, गणेश धुमाळ,राम भंडारी,प्रवीण शेडगे तर लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे,पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे,वाहतूक शाखेचे पोलीस उमेश ढाकणे, आनंद साळुंखे,अनिल गायकवाड,महेश मडके मनोज सोनवणे,विजय काणेकर,संदिप धुमाळ,अजिंक्य जोजारे,ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे,विनायक काळभोर, मयूर काळभोर व श्रीतेज मेडिकल यांनी यामध्ये सहभाग घेतला.
