शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
           शिरूर बसस्थानकालगतच्या नैसर्गिक ओढ्यात सुरू असलेले अनाधिकृत भिंतीचे बांधकाम स्थगित करुन नाल्यात टाकण्यात आलेला राड़ा-रोड़ा साफ करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला असुन तसे निवेदन शिरूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांना देण्यात आले आहे. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,रवि लेंडे आदींच्या सह्या दिलेल्या निवेदनावर आहेत.
         शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये पुणे-नगर रोडवर शिरुर बसस्थानकालगत जुना नैसर्गिक ओढा, नाला
अस्तित्वात आले. नाल्यालगतची जमीन ही शिरुर नगरपरिषदेने व्यापारी संकुल उभारण्यासाठी राखीव
ठेवलेली आहे. नगरपरिषदेच्या राखीव ठेवलेल्या जागेवर विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य वाहतूक महामंडळ, पुणे यांनी अतिक्रमण करुन अनाधिकृत भिंत उभारणेस सुरुवात केलेली आहे. सदर भिंत ही नाल्यामध्ये उभारण्यात येत असल्यामुळे नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदलण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे नैसर्गिक नाल्याशेजारील डंबेनाला, सोनार आळी, व लगच्या परिसराला धोका निर्माण होऊन पाण्याच्या प्रवाहामुळे जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे.या घटनेची गांभिर्याने दखल घेवून तात्काळ अनाधिकृत भिंतीचे बांधकाम स्थगित करुन नाल्यात टाकण्यात आलेला राडा-रोडा साफ करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *