पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  कोरोना विरुद्ध लढण्यास पुणे पोलिसांनी नवीन फंडा लढवला असून त्यांनी एक व्हिडिओ तयार केला यात एक पोलीस अधिकारी राज कपूर यांच्या गाजलेल्या गाण्याचा आधार घेत एक नवीन गीत तयार करून लोकांना कोरोना विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न यातून करत आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून अनेक जण तो  कुतूहलाने पहात आहे सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली असून आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे अनेक आरोग्य कर्मचारी कोराना पॉझिटिव आले असून गृह विलगीकरणात आहेत शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या रोगाचा सध्या मोठ्या प्रमाणावर शिरकाव होत असून नागरिकांनी आपली खबरदारी घेणे अतिशय आवश्यक आहे अनेकांना कोरोनाचा विसर पडलेला आहे त्यांना या रोगाच्या दाहकतेचे स्वरूप काय आहे आणि यापासून स्वतः कसा बचाव करावा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे

          ज्येष्ठ सिनेकलाकार राज कपूर यांच्या अजरामर गीतांपैकी एक गीत “ये भाई जरा देख के चलो” या गीताचा आधार घेऊन “ए भाई जरा मास्क पहेनके चलो”या गीतातून कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडीओ सर्व सोशल मीडियावर प्रसारित होत असून अनेकजण यास पुढे पाठवून प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *