राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  म्हातारपणात वडिलांनी स्वतःच्या लग्नासाठी वधु-वर सुचक मंडळात विवाह नावनोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे. शंकर रामभाऊ बो-हाडे (वय ८०,रा, वैशंपायन आळी, राजगुरूनगर ता.खेड) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आरोपी शेखर शंकर बो-हाडे (वय ४७ ) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्याची कबुली व फिर्याद देत स्वतः आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
      या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर रामभाउ बो-हाडे यांनी परस्पर वधु-वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नासाठी नोंदणी केली होती. याबाबत आरोपी मुलगा शेखर बो-हाडे याच्याशी वडील शंकर बोऱ्हाडे याप्रकाराविषयी खोटे बोलले. तसेच हा प्रकार मुलाला सहन झाला नाही. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोऱ्हाडे यांने स्वयंपाक घरातील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंट्याने वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून त्यांचा खून केला. हि घटना गुरुवारी (दि. ६) रात्रीच्या सुमारास घडली.  या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *