लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) वंचित बहुजन आघाडी हवेली पुणे, व सिद्धार्थ संघ तरुण मंडळ लोणी काळभोर यांच्या वतीने थेऊर फाटा येथे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना चहा-पाणी बिस्किटे  व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती, सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे अन्नदान चालू होते, यात जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई शेलार,संजय भालेराव, दिनेश कांबळे, लोणी काळभोर मा.सरपंच भोलानाथ शेलार, ऍड सुजित कांबळे, संजय कांबळे, अजित भालेराव, दिगंबर जोगदंड, दत्ता कांबळे, अजित कांबळे, प्रदिप फणसे, विकास कांबळे, सिद्धार्थ संघाचे अध्यक्ष विनायक कांबळे उपाध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी सहभाग घेऊन अन्नदानाची व्यवस्था केली होती, त्याचा हजारो अंबेडकरी अनुयायांनी लाभ घेतला.
याठिकाणी लोणी काळभोर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *