थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) नायगाव ग्रामपंचायत व बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी दररोज घरपोच शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे याचे उद्घाटन नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी माजी सरपंच तथा नायगाव पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केले. यावेळी सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड सर्व सदस्य व माजी पदाधिकारी बायफ संस्थेचे अधिकारी उपस्थित होते
या प्रकल्पासाठी बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान उरुळी कांचन यांनी आवश्यक ती सर्व मदत केली असून त्यांच्या सहकार्यामुळे कमी दरात घरपोच शुद्ध पाणी पुरविणे शक्य झाले आहे अशी माहिती सरपंच गणेश गुलाब चौधरी यांनी दिली,शुद्ध पाणी वितरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वितरण समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये बायफ संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आहेत. बायफ संस्थेच्या वतीने पाणी शुद्धीकरण प्रकल्प व वितरण व्यवस्थेसाठी गाडी देण्यात आली आहे शुद्ध पाण्याची गुणवत्ता ठेवण्यासाठी त्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी बायफचे प्रकल्प अधिकारी मानसिंग कड व सल्लागार सिंग यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला
याप्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कल्याणी हागवणे, जितेंद्र चौधरी, दत्तात्रय बारवकर, उत्तम शेलार, बाळासाहेब गायकवाड, अश्विनी चौधरी, आरती चौधरी, संगीता शेलार, प्रियंका गायकवाड, माया चौधरी, माजी उपसरपंच ज्ञानोबा शेलार, विजय चौधरी, गणेश चौधरी, रामचंद्र पवार, संतोष हगवणे, संजय कामठे, सुनील हगवणे, कैलास चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, अमोल चौधरी, नितीन हगवणे, नवनाथ गायकवाड, विजय चौधरी, बाप्पू चौधरी, योगेश चौधरी, नंदू चौधरी, संजय चौधरी, मुकिंदा गुळजकर, गोरख चौधरी, अर्जुन चौधरी, सुभाष मांढरे इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते
