पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना लसीकरणातील पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली असून यामध्ये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात येत आहे आज याची प्रत्यक्ष सुरुवात झाली असून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना लसीकरण केले जात आहे मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिंग या लसीचा वापर केला जात आहे.
संपूर्ण जगात कोरोना या महामारीने हाहाकार माजवला लाखो नागरिक मृत्यू मुखी पडत होते, लोकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे होते यासाठी जागतिक स्तरावर वेगवेगळ्या संशोधनातून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करण्यासाठी संशोधन चालू झाले यात भारत देखील मागे राहिला नाही भारतात सिरम इन्स्टिट्यूट यांनी तयार केलेल्या कोवीशील्ड तर भारत बायोटेक ची कोव्हँक्षिण ही लस नागरिकांना देण्यात आली याच्या सुरुवातीला अग्रभागी असणारे कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले त्यानंतर चौथ्या टप्प्यात वय वर्ष १८ ते ४४ आणि आज पासून पाचवा टप्पा १५ वर्षे ते १८ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे
फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना ने जगात आपली पाळेमुळे पसरवली व आपल्या देशात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत होते त्यामुळे संपूर्ण देशात लोकडाऊन घोषित करण्यात आला ही महामारी कशी रोखायची हा प्रश्न जगातील सर्व देशांत समोर होता यात अनेक संशोधक कामाला लागले व त्या वर्षाच्या शेवटी यावर प्रभावी लस तयार करण्यात आली सर्वात अगोदर रशियाने स्पुटनिक ही लस विकसित केली त्यानंतर अनेक कंपन्यांनी लस विकसित केल्या. आज देशातील ६५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यास आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी तयार आहे.
