पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांच्या हस्ते आयटी नगरीच्या माजी सरपंच पुनम बुचडे व हिंजवडी माण जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर बुचडे यांच्या २०२२च्या दिनदर्शिकेचे बारामती येथे प्रकाशन केले यावेळी अजित पवारांनी माजी सरपंच पुनम बुचडे,समीर बुचडे करत असलेल्या सामाजिक कामाचे कौतुक करुन त्यांनी केलेल्या वर्षभरातील कामाची माहिती जाणून घेतली याबाबत बोलताना बुचडे यांनी सांगितले हिंजवडी माण जिल्हा परिषद गटातील ५000 कुटुंबाना या दिनदर्शिका वितरित करणार असून यात रोजची आवश्यक असलेली दिन विशेष माहिती देण्यात आली असून मागील चार वर्षापासून ते दिनदर्शिकाचे परिसरात वाटप करतात
आयटी नगरी म्हणून नावारुपास येत असलेल्या मारुंजी येथे राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक नागरिक आपली उपजिविका भागवण्यासाठी कामधंद्याच्या शोधात येत असतात तसेच आयटी सेक्टर मध्ये काम करणारे उच्चशिक्षित वर्ग मजूर लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याभागात राष्ट्रवादी काॕग्रेसच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचवून समाजातील उपेक्षित घटकांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी बुचडे सदैव तत्पर असतात हिंजवडी माण मारुंजी, याभागातील शालेय मुलींच्या पालकांचा अपघात विमा योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे असून समाजसेवेचे व्रत घेऊन ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वावर त्यांनी अनेक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत राबवले असून तरुणांचा मोठा संच पक्षाकडे आकर्षित केला आहे.
